सेंट विल्फ्रेड कॉलेज वर ग्राहक संरक्षक कक्षाची धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कर्जत

पनवेल शेडुंग येथील सेंट विल्फ्रेड महाविद्यालयाला शिवसेनेच्या ग्राहक संरक्षक कक्षाने दिलेल्या दणक्याने काढून टाकलेल्या महिला प्राध्यापकाला परत कामावर बोलावण्याचे आश्वासन व्यवस्थपाक कार्यकारिणीला द्यावे लागले आहेत. कोणतीही आगाऊ नोटीस न देता या महाविद्यालयाने एका महिला प्राध्यापकाला कामावरून काढून टाकले होते आणि या महिलेने आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद शिवसेनेच्या ग्राहक संरक्षक कक्षाचे उपजिल्हाप्रमुख एहतेशाम पेनवाला यांच्याकडे मागितली होती.

मुंबई पुणे हायवे लागत शेडुंग टोल नाक्याजवळ असलेल्या सेंट विल्फ्रेड महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यपक मालती सखाराम गाढे यांना व्यवस्थापकीय मंडळाकडून 29 जानेवारी रोजी अचानक कोणतीही नोटीस न देता कामावरून काढण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता मालती गाढे यांना काढून टाकण्यात आल्याने त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधण्याचं प्रयत्न केला, पण त्यांच्याशी त्यांचा संपर्क झाला नाही. म्हणून मग त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्याविरुद्ध शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख एहतेशाम पेनवाला यांच्याशी संपर्क साधला.

पेनवाला यांनी ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष सुधीरभाऊ जोशी यांच्या आदेशावरून व सरचिटणीस अरुण जगताप यांच्या सूचनेवरून जिल्हाप्रमुख रमेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट विल्फ्रेड कॉलेज वर धडक मारली आणि शिवसेनेच्या भाषेत आणि कायद्याच्या भाषेत त्यांनी भानावर आणले. एका गरीब महिलेवर तुम्ही कायदेशीर प्रक्रिया न करता आणि तिची काही चूक नसताना अचानक कामावरून काढून टाकता हे शिवसेना कधी सहन करणारा नाही तिला तत्काळ कामावर बोलावून घ्या, असा दमच त्यांनी मॅनेजमेंटला भारल्यानंतर कॉलेज प्रशासनाने तत्काळ त्या महिला प्राध्यपिकेला कामावर आम्ही बोलावून घेतो असे आश्वासन दिले आहे. यावेळी प्रशासनाशी चारच करण्यासाठी ग्राहक संरक्षक कक्षाचे जिल्हाप्रमुख रमेश म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख अरुण जगताप, तालुका प्रमुख उमेश सावंत, किरण हडप, गजानन माली, कर्जत शहर प्रमुख समीर मुलांनी, अंकुर पाटील, प्रियांक रावळ,इलाज कर्जतवला, कैलास शिंदे उपस्थित होते.