कोरोना नियम मोडणाऱ्या प्रवाशांना एक हजार रुपये दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विमानतळावर कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना 1 हजार रुपये दंड ठोठावला जात आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने नागरी उड्डाण संचालनालयाच्या (डीजीसीए) आदेशावरून 1 एप्रिलपासून ही दंड आकारणी सुरू करण्यात आली आहे. विमानतळांवर प्रवाशांकडून कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन होत नसल्याचे डीजीसीएच्या निदर्शनास आले होते. डीजीसीएने त्याची गंभीर दखल घेतली आहे. कोविड नियमावलीचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्याचे आदेश डीजीसीएने देशातील सर्व विमानतळांना दिले आहेत. नाक आणि तोंड झाकले जाईल, असा मास्क न घालणाऱ्या तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर न राखणाऱ्या प्रवाशांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला जात आहे.