कोरोना नियंत्रणात,  दिवसभरात 447 बाधित, एकाचा मृत्यू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 447 रुग्ण आढळले आहेत, तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत दिवसभरात 798 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 10 लाख 27 हजार 891 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सद्यस्थितीत 4,783 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोना नव्या रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या 10 लाख 52 हजार 176 झाली आहे, तर मृतांचा आकडा 16,667 झाला आहे.