कराटे क्लास सुरू ठेवणाऱ्या चालकावर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना संचारबंदीच्या नियमांचा भंग करत पारनेर महाविद्यालयाच्या आवारातच चक्क कराटे क्लास भरवण्यात आला. ही माहिती मिळताच पोलिसांनी या खासगी कराटे क्लासवर कारवाई केली. या क्लासचालक महिलेवर दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच या क्लासमध्ये मुलांना पाठविणाऱ्या पालकांकडूनही प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पारनेर परिसरात तहसीलदार ज्योती देवरे आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बळप हे पाहणी करीत होते. त्यावेळी संचारबंदीतही त्यांना काही खासगी क्लासेस सुरू असल्याची माहिती मिळाली. पारनेर शहरातील महाविद्यालयाच्या आवारात वैशाली बांगर यांचा खासगी कराटे क्लास सुरू असल्याचे त्यांना दिसले. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी क्लासचालक यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.