
कणकवली तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी शिवसेना धावून आली आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या मोठय़ा संख्येने वाढत आहे. येथील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी विजयराव नाईक फार्मसी कॉलेज कोविड केअर सेंटरसाठी दिले आहे. या कोविड सेंटरची जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी नुकतीच पाहणी केली. कोरोनाचा फैलाव वाढत असताना तालुक्यातच कोविड सेंटर झाल्याने कणकवली तालुकावासियांना दिलासा मिळाला आहे. शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजची जिल्हाधिकारी के मंजुलक्षमी यांनी सर्व वर्ग खोली व परिसराची पाहणी केली. यावेळी आमदार वैभव नाईक,बँक अध्यक्ष सतीश सावंत,शिवसेना नेते संदेश पारकर ,जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,कणकवली प्रांत अधिकारी वैशाली राजमाने,तहसीलदार रमेश पवार, आरोग्य अधिकारी संजय पोळ,पोलीस निरीक्षक मुल्ला, डॉ सी.एम.शिकलगार,नगरसेवक सुशांत नाईक उपस्थित होते



























































