2 मास्क लावाल तर कोरोनापासून वाचाल, एका मास्कने होतोय फक्त 40 टक्के बचाव

‘लॅन्सेट’ नियतकालिकात कोरोना संदर्भातील एक नवीन माहिती समोर आली आहे. लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, कोरोना हवेमधून पसरतो. याबाबत माहिती देताना डॉ. फहीम युनिस यांनी सांगितले की, ‘कोरोनाची लागण होण्यापासून वाचण्यासाठी एन 95 किंवा केएन 95 हे दोन मास्क खरेदी करा आणि दररोज याचा वापर करा. हे मास्क दररोज बदलून घाला. तसेच आठवड्याभरात हे मास्क खराब न झाल्यास याचा पुन्हा वापर केला जाऊ शकतो.’

मेरीलँड युनिव्हर्सिटीच्या संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. फहीम युनूस यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, एअरबोर्नचा अर्थ असा नाही की हवा दूषित आहे. एअरबर्न म्हणजे व्हायरस हवेमध्ये राहू शकतो. विशेषत: बंद ठिकाणी.

याबाबत ‘आज तक’शी बोलताना डॉ. अशोक सेठ म्हणाले आहेत की, गेल्या एका वर्षात कोरोनाची अशी लहर आपण कधीही पाहिली नाही. आपली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. यापासून बचावाचा एकाच उपाय म्हणजे मास्क घालणे. कोरोना रोखण्यासाठी डबल मास्क घालणे आवश्यक आहे. कपड्याचा मास्क केवळ 40 टक्के सुक्षित आहे. यासाठीच आधी सर्जिकल मास्क घाला, नंतर कपड्याचा मास्क घाला. अशा प्रकारे डबल मास्किंगमुळे व्हायरस 95 टक्क्यांपर्यंत रोखले जाऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या