
राज्यात आणि मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून आज दिवसभरात राज्यात, मुंबईत एकही मृत्यू झाला नाही. दिवसभरात 2 हजार 894 जण कोरोनामुक्त झाले, तर सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 18 हजार 369 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या आत आली असून आज 399 रुग्ण सापडले. यातील 375 जणांना कोणतीही लक्षणे नव्हती. यापैकी 24 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर चार जणांना ऑक्सिजन बेड देण्यात आले. दिवसभरात 761 जण कोरोनामुक्त झाले असून सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 753 वर पोहोचली आहे.



























































