
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ नोंदवली जात आहे. काही जिह्यांत लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना लागू करण्याचे संकेत दिले. कडक निर्बंधांची अंमलबजावणी नाइलाजाने करावी लागत असून रविवार, 28 मार्चपासून राज्यभरात रात्रीची जमाबवंदी लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील कोरोनाविषयीचा आढावा जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक, रुग्णालयाचे अधीक्षक यांच्या माध्यमातून आज घेतला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांतील परिस्थितीची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेतली.
राज्यात कोणत्याही परिस्थितीत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याची आवश्यकता आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर होतोय की नाही याची काटेकोरपणे पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱयांना दिले.
कोविड अपडेट
ठाणे – 1020
नाशिक – 2080
पुणे – 3679
संभाजीनगर – 1563
नागपूर – 3055
नगर – 571
नांदेड – 617
शुक्रवारची रुग्णसंख्या
राज्य
रुग्ण – 36902
मृत्यू – 112
मुंबई
रुग्ण – 5515
मृत्यू – 10




























































