
कोरोना प्रतिबंधक लस ही केवळ कोरोनाशी नव्हे तर कर्करोग, पोलिओ, कॉलरा आदी जवळपास 20 आजारांचा मुकाबला करते, अशी मोठी खूशखबर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिली आहे. कोरोना लस ही विविध आजारांवर भक्कम सुरक्षा कवच ठरणार आहे. त्यामुळे लसीचे दोन डोस घ्या आणि तंदुरुस्त राहा, असा सल्ला डब्ल्यूएचओच्या अहवालातून देण्यात आला आहे.
कोरोना विषाणूने मागील दोन वर्षे संपूर्ण जगाला वेठीला धरले आहे. विषाणूचे नवनवे व्हेरिएंट आढळत आहेत. सध्या ओमायक्रोनने जगाची धाकधूक वाढवली आहे. या संकटकाळात कोरोना प्रतिबंधक लसीचा उपाय जबरदस्त प्रभावी ठरणार आहे. ही लस कोरोनाबरोबरच इतर जवळपास 20 आजारांपासून नागरिकांचे संरक्षण करणार आहे, असा दावा डब्ल्यूएचओच्या नव्या अहवालात करण्यात आला आहे. डब्ल्यूएचओने कोरोना लस उपयुक्त ठरत असलेल्या 20 आजारांची यादी जाहीर केली.
या आजारांपासून रक्षण
लसीमुळे कोरोनाव्यतिरिक्त गर्भाशयाचा कर्करोग, पटकी,कॉलरा, घटसर्प, इबोला, हेप बी, इन्फ्लुएंझा, जपानी एन्सेफलायटिस, गोवर, मेंदूज्वर, गालगुंड, डांग्या खोकला, फुफ्फुसाचा दाह,न्यूमोनिया, पोलिओ, रेबीज, रोटा, धनुर्वात, विषमज्वर, कांजण्या, पितज्वर आदी आजारांपासून संरक्षण मिळते, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.




























































