आजपासून केईममध्ये कोरोनावरील मानवी चाचणी सुरू, एथिकल समितीची मंजुरी

मुंबईत कोरोनावरील कोव्हिशिल्ड लसीची मानवी चाचणी आजपासून केईएम रुग्णालयात सुरू होणार आहे. राज्य सरकारने एथिकल समितीने याला मंजुरी दिली आहे. तिसऱया टप्प्यात होणाऱया या चाचणीत 160 रुग्णांवर चाचणी केली जाणार असून त्यासाठी रुग्णालयाकडे आतापर्यंत 350 स्वयंसेवकांचे अर्ज आले आहेत. त्यामधून 160 स्वयंसेवकांची निवड करून त्यांच्यावर कोव्हिशिल्डची चाचणी केली जाणार आहे.

सिरम इन्स्टिटय़ूटने बनवलेल्या ‘कोव्हीशिल्ड’ या लसीच्या मानवी चाचणीला पहिल्यांदा पुण्यात सुरुवात झाली आहे. पुण्यात तिघा जणांना ही लस देण्यात आली. त्यानंतर आता केईएम रुग्णालयात बुधवार, 23 सप्टेंबरपासून चाचणीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. कोरोनावरील मानवी चाचणी पात्र ठरलेल्या स्वयंसेवकांना 35 लाख रुपये विमा संरक्षण तर समूह विमा संरक्षण म्हणून 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान, नायर रुग्णालयातील मानवी चाचणीला अद्याप ‘आयसीएमआर’ने तारीख दिलेली नाही. नायरमध्ये 100 स्वयंसेवकांची निवड करून त्यांच्यावर कोव्हिशिल्डची चाचणी केली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या