एनसीबीच्या एसआयटीमधील एकाला कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी तपास करत असलेल्या एनसीबीच्या एसआयटी मधील एकाला कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर पथकातील अन्य चौघांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी एनसीबीने तपासासाठी एसआयटी तयार केली आहे. त्या एसआयटीमध्ये अधिकारी कर्मचारी मिळून ५ जण आहेत. मंगळवारी रात्री एका कर्मचाNयाला ताप आल्याने त्याला उपचारासाठी दाखल केले. त्याची अँटीजेन चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात उघड झाले. त्याची खबरदारी घेऊन एनसीबीने तपास पथकातील चार जणांची आज कोरोना चाचणी केली. त्या चौघाना कोरोनाची लागण झाली नसल्याचा अहवाल आज सायंकाळी एनसीबीला प्राप्त झाला आहे.

कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाNयाला क्वारंटाईन करण्यात आले असून योग्य ती खबरदारी घेत असल्याचे एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर के. पी. एस. मलहोत्रा यांनी सांगितले. दरम्यान सुशांत सिंगची मॅनेजर श्रुती मोदीला आज जबाब नोंदवण्यासाठी एनसीबीच्या कार्यालयात बोलावले होते. मात्र एसआयटी मधील एकाला कोरोनाची लागण झाल्याने तिला घरी जाण्यास सांगितले. येत्या चार-पाच दिवसात तिला पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाणार आहे.