
जगाच्या तुलनेत हिंदुस्थानात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे असे वक्तव्य केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने जे प्रयत्न केले आणि तातडीने जी पावले उचलली त्याचा हा परिणाम आहे, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाचे जास्त रुग्ण आणि मृत्यू महाराष्ट्र, ओडिशा, आसाम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि नवी दिल्लीमध्ये आढळले आहेत. असे असले तरी जगाचा विचार केला तर हिंदुस्थानात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. यावेळी लोकसभेत बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी हे वक्तव्य केले.
























































