
कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला असून बेरोजगारीचे मोठे संकट लोकांपुढे उभे राहणार आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे (एनएसएस) आणि पिरियोडिक लेबर फोर्स सर्क्हेच्या (पीएलएफएस) अहवालानुसार देशात सरकारी आणि खासगी क्षेत्रातील तब्बल 136 दशलक्ष नोकऱया कोरोनामुळे धोक्यात येण्याचा अंदाज आहे. कोरोनामुळे नोकरदार कवचा कल आता खासगीऐवजी सुरक्षित म्हणजे सरकारी नोकरीकडे असल्याचे पाहायला मिळाले.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलपासून देशात एकूण 1.89 कोटी लोकांनी नोकऱया गमावल्या आहेत. मे मध्ये देशात बेरोजगारीचा दर सर्वाधिक 27.1 टक्के होता. पण या पलीकडे एक आशेचा किरण सुद्धा आहे. आता सरकारी नोकऱयांची मागणी परत एकदा वाढली आहे. सरकारी परीक्षांसाठी प्रशिक्षण घेणाऱया इच्छुकांचे प्रमाण बऱयापैकी वाढले आहे. खासगी क्षेत्रात असलेले आवर्षक वेतन आणि इतर सुविधांमुळे सरकारी नोकऱयांची मागणी कमी झाली होती. परंतु खाजगी क्षेत्रातील नोकऱयांची असुरक्षितता नेहमीच चिंतेचे कारण राहिले आहे. गेल्या 4 महिन्यांत, टेस्टबुकच्या सभासद संख्या 80टक्क्यानी वाढली आहे. टेक्स्टबुकवर शेकडो सरकारी नोकऱयांसाठी 200 हून अधिक अभ्यासक्रम आणि 6500 चाचण्या उपलब्ध आहेत. गेल्या तीन वर्षात टेक्स्टबुकने 38000 हून अधिक लोकांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत केली आहे.





























































