आता बॉक्सर्सना हवीय फाईटसाठी परवानगी; पटियाळा येथे सुरू आहे राष्ट्रीय शिबीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुढल्या वर्षी होणाऱया टोकियो ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानच्या नऊ बॉक्सर्सनी पात्रता मिळवलीय. तसेच गेल्या काही दिवसांपासून पटियाळा येथे राष्ट्रीय सराव शिबीरात हिंदुस्थानचे बॉक्सर्स कसून सराव करीत आहेत. पण आता या बॉक्सर्सना एकमेकांविरूद्ध फाईट करण्याचा सराव मिळायला हवा. यासाठी स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडिया (साई) यांच्याकडून परवानगी मिळायला हवी, असे मत व्यक्त केले आहे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे हाय परफॉमन्स संचालक सॅण्टीयागो निएका यांनी.

मार्च महिन्यानंतर हिंदुस्थानच्या बॉक्सर्सना घरीच रहावे लागले होते. काही ऍथलीट साईच्या ऍकॅडमीत होते. त्यामुळे त्यांच्या फिटनेसवर परिणाम झाला. पण गेल्या दीड महिन्यापासून येथे सुरू असलेल्या ट्रेनिंगमध्ये बॉक्सर्सनी शारीरिक व्यायामावर जोर दिला. पुरुषांसोबत महिला बॉक्सर्सनी यादरम्यान चांगला सराव केलाय. त्यामुळे आता आम्हाला पुढील सराकाला परवानगी मिळायला हवी, असे सॅण्टीयागो निएका यांना वाटते.

आमचे बॉक्सर्स रेडी – जय कवळी

लॉकडाऊनच्या काळात आमच्या बॉक्सर्संनी शारीरिक फिटनेसवर जोर दिला आहे. त्यानुसार सरावही केला आहे. आता आमचे बॉक्सर्स रेडी झाले आहेत. त्यामुळे त्यांना पुढील सरावासाठी लवकरात लवकर परवानगी मिळावी, असे स्पष्ट मत बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव जय कवळी याकेळी म्हणाले.

कोरोना वाढतोय त्यामुळे अडचण

बॉक्सर्सना फाईट करायला मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात साईकडून परवानगी मिळेल याची खात्री देता येणार नाही. कारण हिंदुस्थानात कोरोना वाढतो आहे. पण सध्या साईकडून तयार करण्यात आलेल्या नियमानुसारच बॉक्सर्सचा सराव सुरू आहे.