
पायी चाललेल्या जेष्ठ महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्याने 45 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना 18 जानेवारीला रात्री सव्वा सातच्या सुमारास हडपसरमधील भाजी मंडईतील बसस्थानकात घडली. याप्रकरणी 60 वर्षीय महिलेने हडपसर ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी महिला लोणी काळभोरमधील रहिवासी असून कामानिमित्त हडपसरमध्ये आल्या होत्या. घरी जाण्यासाठी महिला बसची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 45 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे तपास करीत आहेत.






























































