येरवड्यात तरुणाचा खून, एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्ववैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे .

इंजमाम जुबेरी इद्रीसी (वय 22, रा. दरबार बेकरीजवळ, येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे.  आरोपी शहानवाज शेख याला अटक करण्यात आली आहे.  मोहसीन उर्फ मोबा बडेसाब शेख, मोईन कालू शेख, (तिघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंजमामचा भाऊ अन्सार  इद्रीसी (18) याने   येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोईन शेख याच्याशी इंजमामची एक वर्षभरापूर्वी भांडणे झाली होती. त्याचा राग मोईनला होता. त्याच रागातून 22 ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास त्याने इतर साथीदारांच्या मदतीने इंजमामवर   तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी शहानवाजला अटक केली असून फरार आरोपी मोहसीन, मोईन यांचा शोध घेण्यात येत आहे.  पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करत आहेत.