
साकिनाका पोलिसांनी एका सराईत चोराला पकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत. साकिनाका पोलीस ठाण्यात गाडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सपना क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. वाल्मीक कोरे तसेच सुनील कुटे, विनोद भिंगावडे, धनाजी पांढरे व पथकाने कसून तपास करीत दिवा येथे राहणाऱया गौरंग चौधरी ऊर्फ सॅण्डी या सराईत चोराला शोधून काढले. त्याने साकिनाका, मुलुंड, भांडुप व कळवा येथून चोरलेल्या चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

























































