
सामना प्रतिनिधी । नागपूर
सीआरपीएफ जवान गुरुप्रित सिंह यांनी मध्य प्रदेशात निवडणूक रेल्वेने जात असताना गाडीत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. काटोल ते पांदुर्णा दरम्यान धावत्या गाडीत जवानाने गोळी झाडून आत्महत्या केली, बालाघाट येथील ड्यूटी आटोपून हा जवान नागपूर मार्गे राजस्थान येथे जात होता. सततच्या निवडणूकीच्या कार्याभारामुळे त्रासून जवानाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या जवानाचा मृतदेह पांढुर्णामधील रेल्वे पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आला.



























































