क्रिप्टोच्या नावाखाली कोटय़वधींची फसवणूक, दोन एजंट फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठवडय़ात लाखोंच्या कमाईचे आमिष दाखवून सीसीएच व मॅक्स क्रिप्टोच्या नावाखाली गुंतवणूकदारांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघा एजंटाविरुद्ध नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सुमारे 400 ते 500 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे.

आनंद येरमपल्लू आणि जयंत येरमपल्लू अशी त्या एजंटांची नावे असून, फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती.

जुलै 2022 मध्ये सोलापुरात क्लाऊड मायना ऍपचे लाँचिंग करून स्थानिक लोकांना सीसीएच आणि मॅक्स क्रिप्टोच्या नावाखाली मोठी रक्कम गुंतविण्यास भाग पाडण्यात आले. सीसीएचच्या नावाखाली 10 हजार गुंतवा व 40 दिवसांनंतर 15 हजार रुपये मिळवा, तर मॅक्स क्रिप्टोच्या नावाखाली दामदुप्पट डॉलर योजना सुरू करण्यात सुरू करण्यात आली होती.

सुरुवातीला कमी गुंतवणूकदारांना याचा फायदा देण्यात आला. त्यानंतर डॉक्टर, कारखानदार, सराफ व्यापारी, प्रतिष्ठत नागरिक व तरुणांनी गुंतवणूक केली. चौपाड येथे ही योजना राबविणाऱया आनंद येरमपल्लू आणि जयंत येरमपल्लू यांनी ऑफिसही थाटले होते. मात्र, दहा दिवसांपासून हे ऍप बंद पडले आहे. हे ऍप बंद झाल्यापासून हे दोघे एजंटही गायब झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. अद्यापपर्यंत फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नव्हता.सोलापूर, दि. 11 (सा. वा.) – आठवडय़ात लाखोंच्या कमाईचे आमिष दाखवून सीसीएच व मॅक्स क्रिप्टोच्या नावाखाली गुंतवणूकदारांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघा एजंटाविरुद्ध नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सुमारे 400 ते 500 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे.

आनंद येरमपल्लू आणि जयंत येरमपल्लू अशी त्या एजंटांची नावे असून, फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती.

जुलै 2022 मध्ये सोलापुरात क्लाऊड मायना ऍपचे लाँचिंग करून स्थानिक लोकांना सीसीएच आणि मॅक्स क्रिप्टोच्या नावाखाली मोठी रक्कम गुंतविण्यास भाग पाडण्यात आले. सीसीएचच्या नावाखाली 10 हजार गुंतवा व 40 दिवसांनंतर 15 हजार रुपये मिळवा, तर मॅक्स क्रिप्टोच्या नावाखाली दामदुप्पट डॉलर योजना सुरू करण्यात सुरू करण्यात आली होती.

सुरुवातीला कमी गुंतवणूकदारांना याचा फायदा देण्यात आला. त्यानंतर डॉक्टर, कारखानदार, सराफ व्यापारी, प्रतिष्ठत नागरिक व तरुणांनी गुंतवणूक केली. चौपाड येथे ही योजना राबविणाऱया आनंद येरमपल्लू आणि जयंत येरमपल्लू यांनी ऑफिसही थाटले होते. मात्र, दहा दिवसांपासून हे ऍप बंद पडले आहे. हे ऍप बंद झाल्यापासून हे दोघे एजंटही गायब झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. अद्यापपर्यंत फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नव्हता.