दादर टीटीमध्ये इमारतीचे प्लॅस्टर कोसळला, दोन जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर टीटीमध्ये रविवारी संध्याकाळी इमारतीचे प्लॅस्टर कोसळून दोघे जखमी झाले. एका जखमीला केईएममध्ये दाखल करण्यात आले आहे तर दुसऱ्याला भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली.

दादर टीटी येथील प्रीतम इस्टेट इमारतीचे प्लॅस्टर संध्याकाळी 5 वाजता कोसळले. या दुर्घटनेत इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या शापुर वाईनशॉपमधील एका कामगारासह अन्य एक जण जखमी झाला. ओमकुमार कामत (20) याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर दत्ताराम मटकर यांना केईएममधून डिसचार्ज देण्यात आले असून त्यांना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती केईएमचे आरोग्य अधिकारी डॉ. अमजद यांनी दिली.