
मेष ( ARIES – Friday,November 12, 2021)
कामकाज भराभर उरकाल तर सहकाऱ्यांना राग येण्याची शक्यता आहे. तुम्ही आज दिवसभर प्रसन्न राहाल. आपल्या मालकीच्या वस्तूंची काळजी घेतली नाही, तर त्या गहाळ होण्याची शक्यता आहे. नवीन संधी मिळू शकतात.
भाग्यरंग : गुलाबी
वृषभ (TAURUS – Friday, November 12, 2021)
प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर कराल. आज दिवसभरातील बऱ्याचशा घटना आपल्या मनाप्रमाणे घडल्याने दिवस आनंदात जाईल. कुटुंबातील समस्येकडे दुर्लक्ष करू नका.
भाग्यरंग : आकाशी
मिथुन ( GEMINI Friday, November 12, 2021)
आज स्वत:साठी वेळ काढाल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. प्रिय व्यक्तिसोबत प्रवासाला जाण्याची योजना आखाल. कामावर लक्ष केंद्रित कराल.
भाग्यरंग : केशरी
कर्क (CANCER Friday, November 12, 2021)
कोणालाही उधार देऊ नका. रागावर नियंत्रण मिळवा. मानसिक शांतता मिळेल. रिकामा वेळ मिळेल त्याचा वापर कसा करायचा हे तुमच्या हातात आहे.
भाग्यरंग : पिवळा
सिंह ( LEO Friday, November 12, 2021)
जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा मिळेल. ब्युटिपार्लरला जाण्यासाठी वेळ काढाल. त्यामुळे स्वत:कडे लक्ष देता येईल. प्रियकराला नाराज करू नका.
भाग्यरंग : आकाशी
कन्या (VIRGO Friday, November 12, 2021)
एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. सकारात्मक फळ मिळणार आहे. स्वत:हून कोणाला सल्ला देऊ नका.
भाग्यरंग : फिकट निळा
तुळ ( LIBRA Friday, November 12, 2021)
शारीरिक ताण घेऊन कामे करू नका. दूरच्या प्रवासाचा योग जुळून येईल. उगाच घाबरून जाऊ नका. प्राणायाम करा आरोग्य चांगले राहील.
भाग्यरंग : निळा
वृश्चिक ( SCORPIO Friday, November 12, 2021)
स्वत:कडे वेळ द्यायला आज भरपूर मोकळा वेळ मिळेल. अपेक्षेप्रमाणे पैसे मिळतील . वेळ वाया घालवू नका. वाहन चालवताना काळजी घ्या.
भाग्यरंग: गुलाबी
धनु ( SAGITTARIUS Friday, November 12, 2021)
दररोज सूर्यनमस्कार घालण्याची सवय लावून घ्या. सकारात्मक बोला. आरोग्याकडे लक्ष द्या. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील.
भाग्यरंग: चॉकलेटी
मकर ( CAPRICORN Friday, November 12, 2021)
कलेला वाव मिळेल. ताणतणाव दूर करण्यासाठी आवडती पुस्तके वाचा, संगीत ऐका. उत्पन्नाचा नवा स्त्रोत मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन समाधानकारक राहिल.
भाग्यरंग : काळा
कुंभ (AQUARIUS Friday, November 12, 2021)
आरोग्याकडे लक्ष द्या. नोकरी बदलाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मन:शांतीकरिता ध्यानधारणा करा. आनंददायी बातमी कानी पडेल.
भाग्यरंग : चंदेरी
मीन (PISCES Friday, November 12, 2021)
आज दिवसभर कामकाजात व्यस्त राहाल. स्वत:साठी वेळ काढा. सूर्यस्नान केल्याने आरोग्य चांगले राहिल.स्पर्धांमध्ये सरस ठराल.
भाग्यरंग: लाल
























































