
मेष (ARIES – Friday, October 21, 2022)
बोलण्यात मधुरता ठेवा. समाजकार्यात सहकार्य कराल. राग अनावर होऊ देऊ नका. ज्येष्ठ व्यक्तिचा मान राखा. घरातील वातावरण आनंददायी ठेवा. जोडीदारासोबत सामंजस्याने वागाल.
शुभरंग : पोपटी
वृषभ (TAURUS – Friday, October 21, 2022)
मेहनत करण्याची तयारी ठेवा. अवाजवी आत्मविश्वास बाळगू नका. शुद्ध, सात्त्विक आणि चौरस आहार घ्या. व्यवसायात जम बसवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. गणपती अथर्वशीर्ष म्हणा. आपले म्हणणे इतरांना पटवून द्याल. ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न कराल.
शुभरंग : आकाशी
मिथुन (GEMINI – Friday, October 21, 2022)
स्वत:जवळील कौशल्याचा वापर करावा लागेल. प्रसंगावधान राखून निर्णय घ्याल. फलाहार घ्या. आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. घरातील माणसांची मने सांभाळा.
घाईघाईने कुठलेही निर्णय घेऊ नका. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : केशरी
कर्क (CANCER – Friday, October 21, 2022)
सहलीचे योग येतील. बाहेरील पदार्थ खाणे टाळा. निवांत टीव्ही बघण्यासाठी वेळ काढाल. कामाच्या ठिकाणी उत्साह जाणवेल. घरातील लहान मुलांना फिरायला घेऊन जा. कला कौशल्यासाठी व्यासपीठ मिळेल. पांढऱ्या रंगाचा पेहराव परिधान करा. गणपतीला दुर्वा वाहा.
शुभरंग : खाकी
सिंह (LEO – Friday, October 21, 2022)
कष्टाचे फळ मिळेल. सकाळी चालायला जा. आरोग्याची काळजी घ्या. सायंकाळी बागेत फिरायला जा. मानसिक शांततेकरिता ध्यानधारणा करा. विष्णुसहस्त्रनामावलीचे वाचन करा. अडचणीवर योग्य धार्मिक कार्यात भाग घ्याल.
शुभरंग : चंदेरी
कन्या (VIRGO – Friday, October 21, 2022)
कोणत्याही मुलीचे मन दुखवू नका. व्यायामाला महत्त्व द्या. सुगंधी फुलझाड परसात लावा. प्रिय व्यक्तिसाठी वेळ काढा. मिळालेल्या संधीचे सोने करा. स्वत:ला कामात व्यस्त ठेवा. आवडत्या वस्तूची खरेदी कराल.
शुभरंग : जांभळा
तूळ (TULA – Friday, October 21, 2022)
शिवाला अभिषेक घाला. उगाचच उधळपट्टी करू नका. परिक्षेत चांगले गुण मिळवा. मित्रमैत्रिणी अडीअडचणीच्या वेळी मदत करतील. गणपतीचे मनोभावे दर्शन घ्या. लहान मुलांचा गोड खाऊ द्या. जोडीदारासोबत सायंकाळी वेळ घालवाल.
शुभरंग : जांभळा
वृश्चिक ( SCORPIO – Friday, October 21, 2022)
चांदीचे दागिने परिधान करा. आजचा दिवस आनंदात जाईल. वेळ आणि पैसे यांची किंमत करा. तुमच्या कौशल्याची समाजात दखल घेतली जाईल. शुभकार्याचे संकेत मिळतील. कुटुंबात सलोखा राखाल. नातेवाईकांच्या नकारात्मक वृत्तीकडे दुर्लक्ष करा.
शुभरंग : राखाडी
धनु (SAGITTARIUS – Friday, October 21, 2022)
आवडत्या मित्रमैत्रिणींचा सहवास घडेल. अपथ्य करू नका. तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. गरजेच्या वेळी भावंडांची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी इतरांवर तुमचा प्रभाव राहिल. प्रिय व्यक्तिसोबत वेळ घालवाल.
शुभरंग : खाकी
मकर ( CAPRICORN – Friday, October 21, 2022)
कुलदेवतेची उपासना करा. स्वत:साठी वेळ काढाल. नातेसंबंध जपाल. दिवसाची सुरुवात उत्साहवर्धक असेल. आवडत्या वस्तूची खरेदी कराल. वाईट सवयी सोडण्यासाठी हिच वेळ योग्य आहे.
शुभरंग : केशरी
कुंभ (AQUARIUS – Friday, October 21, 2022)
आरोग्याकडे लक्ष द्या. आहारात फळांचा समावेश करा. आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. कोणतीही दगदगीची कामे करू नका. कौटुंबिक सौख्य बिघडवणाऱ्या बाबी टाळा. आर्थिक जबाबदारी वाटून घेण्याची आवश्यकता भासेल. साहस करताना विचार करा.
शुभरंग : सोनेरी
मीन (PISCES – Friday, October 21, 2022)
आत्मविश्वास निर्माण होईल. शेजाऱ्यांना मदत करण्याची संधी मिळेल. मानसिक संतुलन राखा. नित्यनियमाने योगसाधना करा. अभ्यास आणि खेळ यासाठी वेळ मिळेल. वरिष्ठांना न दुखवता तुमचे मत मांडा. नव्या उपक्रमाकरिता पैसे खर्च कराल.
शुभरंग : लाल



























































