Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘1 डिसेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Thursday, December 1, 2022)
गरिबांना अन्नदान करा. कुटुंबात आनंददायी वातावरण असेल. जमीनविषयक व्यवहार करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराला दुखवू नका. समस्यांचे निराकरण वेळीच करा. आवडत्या वस्तूची खरेदी करण्यासाठी आज वेळ काढाल.
शुभरंग : निळा

वृषभ (TAURUS – Thursday, December 1, 2022)
इच्छा प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी आज वेळ काढाल. कल्पनाविश्वात रमू नका. व्यवसायात नव्या संकल्पना राबवाल. आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आह. स्वत:साठी वेळ काढावा लागेल. विश्रांती घ्या. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अडचणींवर मात कराल.
शुभरंग : पिवळा

मिथुन (GEMINI – Thursday, December 1, 2022)
पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा. मनातील भावनांना रोखू नका. आराम करा. सायंकळी मनोरंजनाचे कार्यक्रम पहावेसे वाटतील. नवे तंत्रज्ञान शिकाल. घरातील मुलांसाठी वेळ काढाल. आयुष्यातील महत्त्वाचे क्षण वाया घालवू नका. जुन्या आठवणीत रमाल.
शुभरंग : जांभळा

कर्क (CANCER – Thursday, December 1, 2022)
वडाच्या झाडाला पाणी घाला. पुरातन वस्तूंचे जतन करा. घरी एखादा छोटा समारंभ होण्याची शक्यता आहे. ठरवलेल्या योजना बारगळू शकतात. कोणावरही नाराज होऊ नका. सायंकाळी बाजारातून वाण सामानाची खरेदी कराल. कोणत्याही वादविवादात पडू नका. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : जांभळा

सिंह (LEO – Thursday, December 1, 2022)
दागदागिन्यांमध्ये गुंतवणूक कराल. घरी समारंभाचे आयोजन कराल. सायंकाळी एखादी चांगली बातमी कानावर येईल. व्यवसायात भागीदार फायदा घेतील. मनाजोगी खरेदी होण्याची शक्यता आहे. आवडीचा पदार्थ खायला मिळेल. तब्येत जपा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखीच घडेल, ही अपेक्षा टाळा.
शुभरंग: पोपटी

कन्या (VIRGO – Thursday, December 1, 2022)
चुरमुरे वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. देवपूजेच्या वेळी देवांना चाफ्याची फुले वाहा. घरातील मुलांसाठी वेळ काढाल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. आयुष्यातील महत्त्वाचे क्षण वाया घालवू नका. कच्च्या केळ्याच्या भाजीचा आहारात समावेश करा. नवीन पुस्तकाचे वाचन करा.
शुभरंग : तांबडा

तूळ (TULA – Thursday, December 1, 2022)
जवळच्या नातेवाईकांकडे जाणे होईल. तंदुरुस्त करण्यासाठी नियमित व्यायाम करा. अतिखाणे टाळा. आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तुमच्या विनोदबुद्धीमुळे इतरांना आकर्षित कराल. जोडीदाराला वेळ देण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील.
शुभरंग : किरमिजी

वृश्चिक ( SCORPIO – Thursday, December 1, 2022)
तहानलेल्याला पाणी द्या. आयुष्यात आनंदी व्हाल. विश्रांती आणि विरंगुळ्यासाठी मित्रमंडळींसोबत वेळ घालवा. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित कामे मार्गी लागतील. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. घरातून बाहेर जाऊन मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत असेल. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आज वेळ काढाल.
शुभरंग : मोरपिसी

धनु (SAGITTARIUS – Thursday, December 1, 2022)
पितळी भांडी भगवान विष्णु किंवा दुर्गादेवीच्या मंदिरात दान करा. स्वत:च स्वत:वर औषधोपचार करू नका. आईवडिलांची काळजी घ्या. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलू नका. तुम्ही प्रेम करत असलेल्या व्यक्ति दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्या. नवीन व्यावसायात गुंतवणूक करू शकाल. गरजेला तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आजचा दिवस धार्मिक विधी करण्यासाठी उत्तम आहे.
शुभरंग : खाकी

मकर ( CAPRICORN – Thursday, December 1, 2022)
कुमारिकांना चिंच, पाणीपुरी खाऊ घाला. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे दडपण ठेवू नका. धनलाभाची शक्यता आहे. मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवाल. संवाद कौशल्यात वाढ करावी लागेल. कामातील नवे तंत्र आत्मसात करा. घरातील सदस्यांना समजून घ्या. इतरांना टोचून बोलणे टाळा.
शुभरंग : तांबडा

कुंभ (AQUARIUS – Thursday, December 1, 2022)
सकाळी उंबरठ्याची पूजा करा. मानसिकदृष्ट्या स्थिर राहण्यासाठी ध्यानधारणा करा. योगासने करण्यासाठी आवर्जून वेळ काढाल. आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे. लोकं तुमचे अभिनंदन करतील. कौतुकाची थाप पाठीवर पडेल. आरोग्य चांगले राहिल. तुळशीला रोज सकाळी पाणी घालून नमस्कार करा.
शुभरंग : केशरी

मीन (PISCES – Thursday, December 1, 2022)
गणपतीच्या मंदिरात लाडूच्या प्रसादाचे वाटप करा. स्वत:साठी भरपूर मोकळा वेळ मिळेल. उधार दिलेले धन परत मिळण्याची शक्यता आहे. कोणालाही शब्द देण्यापूर्वी विचार करा. बालपणीच्या आठवणी जाग्या होतील. एकांतात वेळ घालवाल. आजचा दिवस आपल्यासाठी आरामदायी आहे.
शुभरंग : पोपटी