Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’16 जानेवारी’चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Monday, January 16, 2023)
आरोग्याची उगाच चिंता करू नका. प्रलंबित थकबाकी मिळेल. आज घरातली कामे पूर्ण करण्यात वेळ जाईल. मैत्रीमधील चांगला काळ आठवा. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रिय व्यक्तिकडे मनमोकळ्या गप्पा माराल. क्षुल्लक वाद घालत बसू नका.
शुभरंग : निळा

वृषभ (TAURUS – Monday, January 16, 2023)
प्रिय व्यक्तीला पांढऱ्या रंगाची भेटवस्तू द्या. जंक फूड अतिप्रमाणात खाणे टाळा. घरात उत्साहाचे वातावरण असेल. कार्यक्षेत्रात उत्तम कार्य कराल. कामात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न कराल. गुलाबी रंगाचा पोषाख परिधान करा. सकाळी सूर्यनमस्कार करा.
शुभरंग : गुलाबी

मिथुन (GEMINI – Monday, January 16, 2023)
रात्री डोळ्यांवर गुलाब पाण्याची पट्टी ठेवा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. स्वत:साठी वेळ काढाल. नियमित व्यायाम करा. कुटुंबातील सदस्यांकडून प्रोत्साहन मिळेल. रात्री हळद-सुंठ घालून दूध प्या. उधार दिलेले पैसे परत मिळतील. घरात सायंकाळी धूप करा.
शुभरंग : आकाशी

कर्क (CANCER – Monday, January 16, 2023)
शनी मंदिरात बुंदीचा प्रसाद द्या. स्वत:करिता खूप मोकळा वेळ मिळेल. कोणाला पैसे उधार देण्यापूर्वी विश्वसनीयता जाणून घ्या. सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवा. सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या. आहारात बदामाचा समावेश करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तिंसोबत चर्चा करण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : केशरी

सिंह (LEO – Monday, January 16, 2023)
गणपती अथर्वशीर्ष आहे. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला जाईल. नव्या लोकांच्या संपर्कात याल. पितृतुल्य माणसाकडून सल्ला घ्याल. मानसिक समाधान मिळेल. ब्यूटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल. नाती जपा. घराचे सुशोभिकरण कराल.
शुभरंग : पोपटी

कन्या (VIRGO – Monday, January 16, 2023)
चांदीचे नाणे खिशात ठेवा. तब्येत उत्तम असेल. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. नवीन मित्र जोडाल. सायंकाळी काहीतरी खास योजना आखाल. कामाच्या ठिकाणी छानशी ट्रिट मिळेल. घरात समारंभ साजरा कराल. प्रिय व्यक्तिची अनपेक्षित भेट होईल. आवडत्या वस्तू खरेदी कराल.
शुभरंग : हिरवा

तूळ (TULA- Monday, January 16, 2023)
आहार वेळेत घ्या. झटपट पैसे कमवण्याची इच्छा निर्माण होईल. फॅशनेबल कपडे परिधान कराल. इतरांवर अवलंबून राहू नका. नवीन पुस्तकाचे वाचन कराल. प्रिय व्यक्तिकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. छंद जोपासायला मनसोक्त वेळ मिळेल. विनाकारण कोणाचे दोष काढू नका.
शुभरंग : खाकी

वृश्चिक ( SCORPIO – Monday, January 16, 2023)
घराच्या परिसरात पिवळ्या रंगाचे सूर्यफुलाचे झाड लावा. कुटुंबासाठी आनंददायी बातमी मिळेल. कोणाशीही बोलताना मधुरावाणीचा उपयोग कराल. वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्याल. बागकामासाठी वेळ काढाल.
शुभरंग : राखाडी

धनु (SAGITTARIUS – Monday, January 16, 2023)
संयम बाळगा. निरंतर प्रयत्न आणि मेहनतीने यश मिळवाल. कामाच्या ठिकाणी ताणतणावांचे ढग जमा होण्याची शक्यता आहे. आवडता पदार्थ खायला मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मोगऱ्याची फुले तिजोरीत ठेवा. आवडत्या रंगाचा पोषाख घाला.
शुभरंग : किरमिजी

मकर ( CAPRICORN – Monday, January 16, 2023)
शेवयांची खीर बनवून खा. आराम करण्यासाठी वेळ काढाल. रखडलेल्या योजना मार्गी लागतील. सहलीला जाल. कोणालाही शब्द देण्यापूर्वी विचार करा. अंतर्मनाचा आवाज ऐका. आध्यात्मिक कार्यात कार्य करावेसे वाटेल. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन घ्या. आजचा दिवस आपल्यासाठी सर्वोत्तम आहे.
शुभरंग : मोती

कुंभ (AQUARIUS – Monday, January 16, 2023)
तणावमुक्त राहा. आर्थिक लाभ होईल. घरात सुख-समृद्धी आणि शांतता नांदेल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याकरिता वेळ मिळेल. आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहपूर्ण आहे. वरिष्ठ खूश असतील. मनोराज्यात रमू नका.
शुभरंग : पिवळा

मीन (PISCES – Monday, January 16, 2023)
डोळ्यांची काळजी घ्या. शांत आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही नवीन व्यक्तिला पैसे उधार देऊ नका. चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. स्वत:साठी वेळ काढाल. नयनरम्य ठिकाणांना भेटी द्याल. आजचा दिवस आपल्यासाठी सुखदायक आहे. घराबाहेर पडताना मोठ्यांचे आशीर्वाद घ्या
शुभरंग : चंदेरी