सासरच्या मंडळींना गुंगीचे औषध देऊन सुनेने पैसे केले लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । भिवानी

हरयाणा मधील भिवानी जिल्ह्यात एका सुनेने आपल्या सासरच्या मंडळींना चहातून गुंगीचे औषध दिले. सर्व बेशुद्ध झाल्यानंतर घरातील २५ हजार घेऊन ती पळून गेली.

कुलदीप याची पत्नी सपनाने सकाळी चहा बनवला. तो चहा तिने सासू सासरे, दिर, मुलगा आणि मुलीला दिला. चहा घेतल्यानंतर सगळ्यांची तब्येत अचानक बिघडली आणि सर्व बेशुद्ध झाले. सगळे जेव्हा शुध्दीवर आले तेव्हा त्यांनी घरात सपनाचा शोध घेतला. परंतु ती घरातून पळून गेली होती आणि २५ हजारही चोरले होते. सर्व कुटुंबीयांवर जवळच्या इस्पितळात उपचार सुरू असून पोलिसांत लवकरच गुन्हा दाखल केला जाईल असे सासर्‍यांनी म्हटले.