होमिओपॅथीमुळे एका महिन्यात कोरोना आटोक्यात, होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांचा दावा

होमिओपॅथीमुळे 100 टक्के ही साथ महिन्यात आटोक्यात येईल, हा मला विश्वास आहे. आज आपण आयसोलेशन तसेच क्वॉरंटाइन करत आहोत. यामुळे कोरोनाचा संसर्ग आपण टाळत आहोत. त्यानुसारच होमिओपॅथी उपचारांनी आपण सध्या जे मृत्यूचे प्रमाण आहे ते निम्म्यावर आणू शकतो.

कोरोना रोखण्यासाठी आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप ठिकठिकाणी करण्यात आले. या गोळ्यांचा खरेच लाभ झाला का? होमिओपॅथीमुळे कोरोनावर उपचार होऊ शकतात का? त्याचप्रमाणे कर्करोगासारख्या गंभीर आजारावर होमिओपॅथी कशी लागू पडते याबाबत प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. शैलेश देशपांडे यांच्याशी केलेली बातचीत.

होमिओपॅथी आणि ऍलोपॅथी उपचारांमध्ये नेमका काय फरक आहे?

– आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी होमिओपॅथी ही अत्यंत प्रभावी उपचार पद्धती आहे. ऍलोपॅथी उपचारांत आजार बरा करण्यासाठी गोळ्या दिल्या जातात. या गोळ्या घेऊन आजार बरा झाला तरी शरीर मात्र सुदृढ झालेले नसते. होमिओपॅथी हेच करते आजार कोणता आहे. तो नेमका का झाला? त्याचा संबंधित व्यक्तीच्या शरीरप्रकृतीशी नेमका काय संबंध आहे याचा अभ्यास करून त्यानुसार औषधोपचार केले जातात. माणसाचे शरीर ठणठणीत करून आजाराचे उच्चाटन किंवा तो होणारच नाही यादृष्टीने उपचार करणे म्हणजेच होमिओपॅथी.

कर्करोगासारख्या गंभीर आजारावर होमिओपॅथी कशी प्रभावी ठरते?

कर्करोगासारख्या गंभीर आजारावर उपचार करण्याच्या पद्धतीत ऍलोपॅथी एका बाजूने जाते तर होमिओपॅथी एका बाजूने. केमोथेरपी, रेडिएशन यासारख्या उपचारांतून रुग्ण बरे केले जातात. होमिओपॅथीमध्ये कर्करोग झालेल्या रुग्णाचे शरीर आणि प्रकृती ठणठणीत करून त्याला या आजारामुळे होणाऱया दुष्परिणांपासून वाचवले जाते. यामुळे रुग्णाचे आयुष्यमान वाढते. सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांच्यावरही होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. केमोथेरपी त्यांना सूट होत नव्हती, लीव्हर तसेच अन्य अवयवांवर विपरीत परिणाम होत होता. अशावेळी त्यांच्यावर उपचार करणे एक आव्हान होते आणि ते आम्ही स्वीकारले. नाटकाच्या प्रयोगासाठी उभे राहायची त्यांची उमेद होती. त्यांच्या या उमेदीनुसारच त्यांच्यावर होमिओपॅथी पद्धतीने उपचार करून त्यांना या नाटकाच्या प्रयोगासाठी उभे करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. त्याचप्रमाणे एक शेतकरी माझ्याकडे आला. त्याला ब्लड कॅन्सर होता. कर्करोगाच्या उपचारांसाठी सुरुवातीच्या काही महिन्यांतच त्याला आपली सर्व जमीन विकावी लागली होती. काय व्हायचं ते होईल उपचार नकोत, इथपर्यंत हा शेतकरी आला होता. आमच्याकडे आल्यानंतर त्याच्यावर उपचाराचे आव्हान आम्ही स्वीकारले आणि या उपचारांनी तब्बल 12 वर्षे खाऊन-पिऊन सुखी आयुष्य त्याने काढले. हाच होमिओपॅथी औषधाचा परिणाम आहे. अत्यंत गंभीर आजार असलेले 70 ते 80 टक्के रुग्ण होमिओपॅथी उपचारांनी बरे झाले आहेत.

कोरोनावर होमिओपॅथी कशी प्रभावी ठरेल?

कोरोनावरील महामारीत होमिओपॅथी निश्चितच प्रभावी ठरू शकेल. होमिओपॅथीद्वारे उपचारांनी 98 टक्के रुग्णांना या आजारापासून दूर ठेवता आले आहे. कोरोना होऊच नये यासाठी पहिल्यांदा मी रुग्णांवर उपचार केले. परिणामी या सर्वांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या. अवघ्या 1 ते 2 टक्के रुग्णांना कोरोनाची लागण झाली तरी त्यांना या आजाराची कोणतीच लक्षणे जाणवली नाहीत आणि उपचारांनी ते ठणठणीत बरे झाले.

आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले, मात्र तरीही लोक पॉझिटिव्ह आले?

सर्व रुग्णांवर एकाच पद्धतीने उपचार होऊच शकत नाही. प्रत्येकाची शरीरप्रकृती ही वेगळी आहे. आपल्या देशातील ठिकठिकाणचे हवामानही वेगळे आहे. आपले ऋतूमानही वेगवेगळे आहे. त्यानुसारच औषधोपचार होणे गरजेचे आहे. उपचार तज्ञ होमिओपॅथ डॉक्टरांच्याच मार्गदर्शनाखाली होणे आवश्यक आहेत. ज्या आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटण्यात आल्या त्या नेमक्या किती ऑथेंटिक होत्या याबाबतही प्रश्नचिन्ह आहेत. या गोळ्या प्रभावी ठरत आहेत यासाठी कोणता रिसर्च करण्यात आला.हे सर्व वैज्ञानिकदृष्टय़ा झाले असते तर प्रभावी ठरले असते.

कोरोनावरील होमिओपॅथी उपचारासाठी केंद्र सरकारकडून परवानगी आहे का?

ज्याप्रमाणे ऍलोपॅथीने उपचार केले जात आहेत त्याप्रमाणे कोरोनावरील होमिओपॅथी उपचारांसाठी सरकारकडून पाठिंबा मिळालेला नाही. सरकारकडून संशोधनासाठी आणि हे संशोधन मांडण्यासाठी व्यासपीठच उपलब्ध करून दिले गेलेले नाहीत. केंद्र सरकारच्या आयुषकडूनही यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. आयसीएमआरकडूनच यासाठी होमिओपॅथीला परवानगी मिळालेली नाही. मुळात आयसीएमआर ऍलोपॅथीवर काम करणारी संस्था आहे. ही संस्था होमिओपॅथीबाबत कसे ठरवू शकते, हाही प्रश्नच आहे.

कोरोनावर अद्याप लस नाही, अशा परिस्थितीत होमिओपॅथीने कोरोना कसा आटोक्यात येईल?

होमिओपॅथी उपचारांसाठी सरकारचा पाठिंबा मिळाल्यास महिनाभरात कोरोना आटोक्यात येईल. हे मी स्वतः केलेल्या उपचारांनुसार सांगू शकतो. पण यासाठी तज्ञ डॉक्टरांकडून संशोधनात्मकरीत्या केल्या जाणाऱया उपचारांच्या अनुभवाची आवश्यकता आहे. सरकारने पाठिंबा दिल्यास होमिओपॅथी उपचारांनी ही साथ नक्कीच आटोक्यात येईल.

(डॉ. शैलेश देशपांडे, संपर्क : 9923344957)

आपली प्रतिक्रिया द्या