दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरला एनसीबीचे समन्स

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खानसह सात जणांना एनसीबीने चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. शुक्रवारी दीपिकाची तर शनिवारी श्रद्धा आणि साराची चौकशी केली जाणार आहे. रात्री उशिरा एनसीबीच्या पथकाने  श्रद्धा कपूर, सारा अली खानच्या घरी समन्स पाठवले आहे. चौकशी समन्समुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) तपास करून काही पेडलरला बेड्या ठोकल्या. त्या पेडलरच्या चौकशीत बॉलीवूड अभिनेत्रीच्या मॅनेजरची नाव समोर आले. तपासात एनसीबीच्या हाती काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट लागले. ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, राकुल प्रीत सिंगला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. गुरुवारी राकुल प्रीत सिंग, सिमोन खंबाटा आणि श्रुती मोदीची चौकशी केली जाणार असल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले. एनसीबीचे पथक हे शुक्रवारी दीपिकाची चौकशी करणार आहे. दीपिकाच्या चौकशीनंतर शनिवारी एनसीबी श्रद्धा कपूर आणि सारा अली खानची समोरा समोर बसवून चौकशी करणार आहे.

एनसीबीने सुशांतची मॅनेजर जया साहाची चौकशी केली. तिच्या चौकशीत एनसीबीला काही महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे. तर चित्रपट निर्माते मधू मॅन्टेनाला आज सकाळी साडेअकराच्या सुमारास एनसीबीच्या कुलाबा येथील गेस्ट हाऊसमध्ये आले होते. काही तास त्याची चौकशी झाली. त्याचप्रमाणे क्वान कंपनीचे ध्रुव चितगोपेकर याची देखील एनसीबीने चौकशी केली. एनसीबीने आज बॉलीवूडशी संबंधित असलेल्या आणखी दोघांची चौकशी केली. गुरुवारी त्या दोघांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या