
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे तिला हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता तिची प्रकृती सुधारली असून ती पुन्हा सेटवर परतल्याची माहिती आहे.
वृत्तानुसार, दीपिका सध्या हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये प्रोजेक्ट के या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. 12 जूनला शूटिंगदरम्यान अचानक हृदयाचे ठोके वाढल्याने दीपिकाला अस्वस्थ वाटू लागले. शूटिंग अर्धवट सोडून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ती सेटवर परतली आहे. प्रोजेक्ट के या चित्रपटात दीपिकासोबत बाहुबली स्टार प्रभास आणि महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. आगामी काळात ती शाहरुखसोबत पठाण आणि हृतिकसोबत फायटर या चित्रपटात देखील झळकणार आहे.





























































