
देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक असलेले मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा व्यावसायिक विनीत मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हिच्यासोबत साखरपुडा झाला. य़ा साखरपुढ्याला बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र यात लक्ष वेधले ते पारंपारिक साडीत आलेल्या दीपिकाने. दीपिका ही लाल रंगाच्या साडीत फारच सुंदर दिसत होती.
View this post on Instagram
दीपिकाने नेसलेली साडी ही तोराणी या ब्रँडची असून तिला सिंदूरी ताशी साडी असे नाव आहे. ही साडी प्युअर ऑरगँझा मटेरियलची असून तिची किंमत तब्बल 1 लाख 49 हजार 500 रुपये आहे. दीपिकाने नेसलेली ही साडी फारच सुंदर असून त्यावर जरदोसी वर्क केलेले आहे. या साडीवर तिने वर्कने भरलेला ब्लाऊज घातला आहे.



























































