
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोडपे असलेले अभिनेत्री दीपिका आणि अभिनेता रणवीर सिंग हे आज इटली येथे विवाहबंधनात अडकणार आहेत. दीपवीरचे लग्न ज्या ठिकाणी होणार आहे तिथे अगदी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली असून लग्नातील कोणताही फोटो शेअर करण्यास मनाई करण्यात आली आहे. दीपवीरच्या लग्नासाठी इटलीला गेलेल्या एका प्रसिद्ध गायिकेने स्वत:चा फोटो शेअर केला होता मात्र दीपिका आणि रणवीरने त्या गायिकेला तो फोटा हटवायला सांगितला.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक हर्षदीप कौर ही तिचा पती मनकीत सिंहसह रणवीर व दीपिकाच्या लग्नासाठी इटलीला गेली आहे. हर्षदीपने मंगळवारी झालेल्या मेहेंदीच्या कार्यक्रमात देखील परफॉर्म केले. त्यानंतर त्यांनी लेक कॉमोमध्ये स्वत:चा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यासोबत तिने इटलीतील एक सुंदर दिवस अशी कॅप्शन दिली होती. मात्र काही वेळाने रणवीर व दीपिकाने हर्षदीपला तिच्या अकाऊंटवरील फोटो हटविण्याची विनंती केली. त्यामुळे हर्षदीपला तो फोटो डिलीट करावा लागला.



























































