
सामना ऑनलाईन । डेहराडून
डेहराडूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय कसोटी मैदानावर झालेल्या कसोटीमध्ये अफगाणिस्तानने ऐतिहासिक विजय मिळवला. अफगाणिस्ताने आयर्लंडचा 7 विकेटने पराभव करत कसोटी क्रिकेटमधील पहिल्या विजयाची नोंद केली. रहमत शहा याने 76 आणि एहसान उल्लाह जनत याने नाबाद 65 धावांची मॅचविनिंग खेळी केली.
अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 147 धावांचे आव्हान होते. चौथ्या दिवशी अफगाणिस्तानने एक बाद 29 धावांपुढे खेळण्यास सुरुवात केली. शाह आणि एहसानने दुसऱ्या विकेटसाठी 139 धावांची भागिदारी केली. अफगाणिस्तानने चौथ्या दिवशी तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये हे आव्हान पार केले. रहमत शाह याने दोन्ही डावांमध्ये दमदार फलंदाजी केल्याने त्याला सामनावीरचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
धावफलक –
आयर्लंड – 172 आणि 288
अफगाणिस्तान – 314 आणि 149



























































