
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दिल्ली पोलीस दलातील एका अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने पोलीस मुख्यालयावरून उडी मारून आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रेम बल्लभ (55) असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी बल्लभ यांचा मृतदेह पोलीस मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पडलेला आढळला. प्रेम बल्लभ यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Delhi: Prem Ballabh, 55 year old ACP rank official, who died after he allegedly jumped off from the Police Headquarters building. pic.twitter.com/ISX6JTkXEA
— ANI (@ANI) November 29, 2018
प्रेम बल्लभ हे दिल्ली पोलीस दलात गुन्हे विभागात कार्यरत होते. त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना पोलीस पदकाने सन्मानीत देखील करण्यात आले होते. त्यामुळे अशा उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या आत्महत्येमुळे दिल्ली पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांकडून या आत्महत्ये प्रकरणी अद्याप कोणतेही विधान केलेले नाही.


























































