गुरूवर शिष्याची मात, पंतच्या नेतृत्वात दिल्लीचा चेन्नईवर दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलचे चॅम्पियन्स अशी ओळख असलेल्या चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेट्सने मात केली. दिल्लीचा नवा कर्णधार ऋषभ पंत याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजीला उतरणाऱ्या चेन्नईने सुरेश रैनाची अर्धशतकी खेळी आणि सॅम करनच्या झटपट धावांच्या बळावर दिल्लीसमोर 20 षटकात 7 बाद 188 धावांचं आव्हान दिलं होतं.

या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या सलामीवीरांनी चेन्नईच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत दिल्लीसाठी विजयश्री खेचून आणली. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या दमदार कामगिरीमुळे दिल्लीसाठी विजय सोपा ठरला. सामन्यात 85 धावांची खेळी केलेल्या शिखर धवनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.