
राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या सीजेपी (CJP) च्या आंदोलनाला गुरुवारी हिंसक वळण लागले. आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कठोर भूमिका घेत सीजेपीच्या 1500 हून अधिक समर्थकांना आणि आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, कनॉट प्लेटच्या हनुमान मंदिराजवळ आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. ज्यामध्ये 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जंतरमंतर परिसरात अचानक झालेल्या या घडामोडींमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


























































