कोरोनाचा देशातील दुसरा बळी, दिल्लीत 68 वर्षीय महिलेचा मृत्यू

454

कोरोना व्हायरसच्या संकटाने संपूर्ण जग हादरून गेलेलं असताना हिंदुस्थानातही या व्हायरसने शिरकाव केला आहे. कोरोनाची लागण झालेल्या दिल्लीतील एका 68 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तब्येत बिघडल्याने या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ही महिला काही काळासाठी व्हेंटिलेटरवर होती. आता तिचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला तिच्या मुलापासून कोरोनाचा संसर्ग झाला होता. मृत महिलेचा मुलगा हा स्वित्झर्लंडहून परतला होता. मुलगा जेव्हा परत आला तेव्हा त्यामध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आढळले होते. या महिलेवर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते, तेथेच तिचा शुक्रवारी मृत्यू झाला. महिलेच्या मुलावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, याआधी गुरुवारी कर्नाटकातील कलबुर्गी येथील एका 76 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या