आचरट फोटोमुळे दिशा पटानी झाली ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

एम एस धोनी..द अनटोल्ड स्टोरी आणि बागी २ या सारख्या सुपरहीट चित्रपटात काम करणाऱ्या दिशा पटानीला लोकांनी पुन्हा एकदा ट्रोल केले आहे. धनत्रयोदशीला दिशाने तिच्या इन्स्टाग्रामवर हातात पणती घेतलेला फोटो शेअर केला आहे. त्यात तिने सोनेरी रंगाचा लेहंगा आणि त्यावर सुंदर ओढणी घेतली आहे. पण ब्लाऊजच्या ऐवजी दिशाने कॅलविन क्लेन या ब्रँडची स्पोर्टस ब्रा घातल्याचे यात दिसत आहे. एकीकडे दिवाळी साजरी करत असल्याचे दाखवण्यासाठी तिने हिंदुस्थानी पेहरावाचा अपमान केल्याचं काहीजणांनी तिला म्हटल आहे. तर दिवाळी साजरी करण्याच्या आड दिशा एका ब्रँडचं प्रमोशन करत असल्याची टीकाही करण्यात आली आहे. तर काहीजणांनी तिच्यावर खालच्या पातळीचे विनोदही केले. यामुळे दिशाने ही पोस्ट आता प्रायव्हेट केली आहे.

सोशल साईटवर बोल्ड फोटो शेअर करण्याची ही काही दिशाची पहिली वेळ नाहीये. तिने याआधीही कॅलविन क्लेन या ब्रँडचे प्रमोशन करताना अंतर्वस्त्र घालून बोल्ड शूट केले आहे. त्यावेळीही तिला ट्रोल करण्यात आले होते. पण तरीही तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. ते तिला ट्रोलही करतात आणि तिचं कौतुकही करतात.