
दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा ईडीने समन्स पाठवलं आहे. ईडीने 21 डिसेंबर रोजी केजरीवाल यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
केजरीवाल यांना ईडीकडून या आधीही नोटीस पाठवण्यात आली होती. पण, केजरीवाल यांनी ईडीसमोर हजेरी लावली नव्हती. ईडीने दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू केला आहे. यापूर्वी 2 नोव्हेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, केजरीवाल आणि आपच्या अन्य नेत्यांनी ही नोटीस बेकायदेशीर असल्याचं म्हणत ती परत घ्यावी अशी मागणी उचलून धरली होती.
























































