सहा वर्षांच्या बालकालाच पहिलीत प्रवेश, केजीसाठी वय वर्ष तीनची अट

केजी आणि इयत्ता पहिलीमधील शाळा प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने किमान वयाची अट निश्चित केली आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून प्ले ग्रुप, नर्सरी प्रवेशासाठी बालकाने वयाची तीन वर्षे पूर्ण करणे आवश्यक असेल. तसेच सहा वर्षे पूर्ण असलेल्या बालकाला पहिलीत प्रवेश दिला जाणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रवेशासाठी निश्चित केलेली किमान वयाची अट राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमधील प्रवेशासाठी लागू असणार आहे. याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यापूर्वीच्या तरतुदीनुसार 5 वर्षे पूर्ण असलेले बालवही पहिलीमधील प्रवेशासाठी पात्र ठरत होते. तसेच विविध शिक्षण मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांमध्ये पहिली प्रवेशासाठी वेगवेगळी वयोमर्यादा वेगवेगळ्या दिनांकास ग्राह्य धरली जात होती. केजी प्रवेशासाठीही निश्चित अशी वयाची अट नव्हती. त्यामुळे यापुढे शाळा प्रवेशाच्या वयोमर्यादेत एकवाक्यता आणण्यासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या