
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावात जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागामार्फत निकृष्ट दर्जाचे बांधण्यात आले आहेत. ह्या बंधाऱ्यांचा शेतकऱ्यांना कोणताही उपयोग होत नाही. केवळ ठेकेदारांसाठी हे बंधारे बांधण्यात आले असल्याचा आरोप पांग्रड शिवसेना शाखा प्रमुख रामचंद्र मेस्त्री यांनी केला आहे. तसेच या प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान या बंधाऱ्यांची तपासणी करून चौकशी करण्याची सुचना जिप लपा विभागाला दिली असल्याची माहिती रामदास मेस्त्री यांनी दिली.
कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागामार्फत सुमारे १२ सीमेंटचे पक्के बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र हे बंधारे निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. तसेच हे बांधारे चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आले आहेत. बांधण्यात आलेल्या बांधाऱ्यांचा तेथील शेतकऱ्यांना कोणताही उपयोग होत नाही. तसेच ज्या बंधाऱ्यात मुबलक पाणी आहे ते अद्याप अडविण्यात आलेले नाही आणि कच्चे बांधारे बांधन्यावर भर दिला जात आहे. तसेच हे बंधारे ठेकेदारांच्या सोयीनुसार बांधले गेले असल्याचा आरोप ग्रामस्थ तथा शिवसेना शाखा प्रमुख रामचंद्र मेस्त्री यांनी यांनी केला आहे. या निकृष्ट बांधाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी पांग्रड ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. दरम्यान आमदार नाईक यांनी या मागणीची दखल घेत या बंधाऱ्यांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी सुचना आमदार वैभव नाईक यांनी जिप लपा विभागाला केली असल्याची माहिती पांग्रड शिवसेना शाखा प्रमुख रामचंद्र मेस्त्री यांनी दिली. यावेळी आनंद मर्गज, रामचंद्र कदम उपस्थित होते.
…..अन्यथा कुडाळ पस समोर उपोषण छेडणार!
पांग्रड गावातील निकृष्ट बांधाऱ्यांची येत्या आठ दिवसात लपा विभागामार्फत चौकशी होवून कारवाई न झाल्यास कुडाळ पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांसह उपोषण छेडणार असल्याचा ईशारा रामचंद्र मेस्त्री यांनी दिला आहे.
































































