देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री, नवनीत राणांनी सांगितली मन की बात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिंधे सरकारमध्ये सातत्याने देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख सुपर सीएम किंवा दुसरे मुख्यमंत्री असा केला जातो. त्यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी तर आज फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री आहेत. तेच महाराष्ट्राचा विकास करू शकतात, अशी मन की बात सांगितली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या समक्षकच नवनीन राणा यांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केले. त्या म्हणाल्या, गोवा, गुजरात ज्या ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे पाऊल पडले तिथे न्यायासाठी लढणारा व्यक्ती आपण पाहिला. त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभे राहिले पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण उपमुख्यमंत्री आहात. पण ज्या प्रकारे तुमच्या कामाचा आवाका आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे आमच्या सगळ्यांची कामे करता ते पाहून आमच्या मनात आम्हाला हेच वाटते की तुम्हीच आमचे मुख्यमंत्री आहात.