राम मंदिराप्रश्नी धर्मसंसदेकडून मोदी सरकारवर कडाडून टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । प्रयागराज

अयोध्येतील राम मंदिर निर्माण, गोरक्षा आणि गंगा शुद्धीकरणासह अनेक मुद्द्यांवरून धर्मसंसदेने मोदी सरकारला घेरले आहे. प्रयागराजमध्ये द्वारकापीठचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी तीन दिवसीय धर्म संसदेचे आयोजन केले आहे. राम मंदिराबाबत योग्य ती पावलं न उचलल्यामुळे मोदी सरकारविरोधात धर्मसंसदेत टीकेचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तीन दिवस ही धर्मसंसद चालणार असून या संसदेत राम मंदिर हा प्रमुख मुद्दा असणार आहे.

सोमवारी सकाळी ११ वाजता या धर्मसंसदेला सुरूवात झाली. साध्वी पुर्णांबा यांनी मोदी सरकारवर टीकेचा प्रस्ताव आणला आणि तो बहुमताने पास झाला. गेल्या वर्षी वाराणसीत झालेल्या धर्मसंसदेत मोदींना राम मंदिराबाबत ठोस पावलं उचलण्याचे निर्देश गेले होते. परांतु त्यांनी कुठलीच कार्यवाही न केल्याने धर्मसंसदेने हा टीकेचा प्रस्ताव आणला.

या धर्मसंसदेत सर्व राजकीय पक्षांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. या धर्मसंसदेत भाजपकडून खासदार गोपाल नारायण आणि समाजवादी पक्षाचे नेते रेवती रमण सिंह यांनी हजेरी लावले आहे.

भाजप खासदार गोपाळ नारायण सिंह म्हणाले की, “संविधानाच्या बाहेर जाऊन राम मंदिराचा प्रश्न नाही सोडवू शकत.” तसेच राम मंदिर निर्माण होण्यासाठी वेळ लागत असून त्यासाठी हिंदू समाजच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. लोकसभेत भाजपला बहुमत आहे परंतु राज्यसभेत भाजप अल्पमतात असल्याचेही त्यांनी सांगितले. तर सपा नेते रेवती रमण सिंह म्हणाले की, राम मंदिराच्या मुद्द्यावर आपण काहीच बोलणार नसून गंगा शुद्धीकरणावर आपण आपेल मत मांडणर असल्याचे त्यांनी म्हटले.

जोपर्यंत राम मंदिर निर्माणाची तारीख कळत नाही तोपर्यंत या धर्मसंसदेतून साधू सन्यांसी हटणार नाही असा इशारा स्वामी अविमुक्तश्वेरानंद यांनी दिला आहे. ३० जानेवारीपर्यंत ही धर्मसंसद सुरू राहणार आहे. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी विश्व हिंदू परिषद धर्मसंसदेचे आयोजन करणार आहे. प्रयागरामधील अर्धकुंभसाठी आलेल्या साधू आणि सन्यासांनी मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.