LIVE- नगर: मतदान करायला गेलेल्या पत्रकाराला पोलिसांची मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election

सामना ऑनलाईन, मुंबई

  • नगर महानगरपालिका निवडणुकीत प्रगतविद्यालयात शिवसेना उपनेते अनिल राठोड, शशिकला राठोड, विक्रम राठोड, संभाजी कदम, मंदार मुळे, प्रनिल शिंदे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.nagar-leader-voting
  • नगर महापालिकेसाठी दुपारी 1.30 वाजेपर्यंत 33 टक्के मतदान.
  • नगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानासाठी गेले पत्रकार संदीप रोडे यांना पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
  • त्याचा निषेध करण्यासाठी सर्व पत्रकार तसेच छायाचित्रकार व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी हेतू खानापूर ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी संबंधितांवर कारवाई करावी तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
  • नगर- प्रभाग क्रमांक 9 मधील भाजपाचे उमेदवार प्रदीप परदेशी यांच्या कार्यालयाची श्रीपाद छिंदम यांच्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केली असून या प्रकारामुळे तेथील वातावरण तंग झाले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
  • पाहा व्हिडीओ-
  • नगर- सकाळी अकरा वाजेपर्यंत महानगरपालिकेसाठी 14 टक्के मतदान झाले होते.
  • मतदानासाठी पायपीट : नगर- सावेडी कॉटेज कॉर्नर मतदान केंद्रावर मतदारांना एक ते दीड किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.
  • पोलिसांनी वाहने दूरवरच अडविली आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.
  • एका बाजूला मतदान करण्याचे आवाहन केले जात असून दुसरीकडे पोलीस सामान्य नागरिकांशी उर्मट भाषा वापरत आहेत, उमेदवांराकडूनही प्रशासनाच्या त्रासाची तक्रार.
  • नगर- सावळी येथील प्रभाग कार्यालयांमध्ये शिपाई पदावर मतदानासाठी नियुक्त केलेले महानगरपालिकेतील कर्मचारी अशोक सूर्यवंशी यांचा आज मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
  • वेडीतील प्रभाग कार्यालयांमध्ये शिपाई पदावर सूर्यवंशी यांची मतदानासाठी नियुक्ती केली होती.
  • शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर तसेच जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार हे नगर शहरामध्ये सर्वत्र जाऊन पाहणी करताना दिसत आहेत.
  • नगर शहरामध्ये दादा चौधरी विद्यालय मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागलेल्या दिसून येत होत्या.nagar-voting-6
  • नगर- येथील सारडा महाविद्यालयांमध्ये खोली क्रमांक 3 मध्ये एक तास मशीन बंद पडले होते. त्यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. विशेष म्हणजे या मशीनमध्ये डाळी आढळून आल्या होत्या.
  • nagar-voting-4
  • धक्कादायक! श्रीपाद छिंदमसाठी चक्क मतदान केंद्रावर ‘इव्हीएम’ची पूजा वाचा सविस्तर बातमी
  • chindam-pooja-1
  • धुळे- पालिकेच्या 74 जागांसाठी 355 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शहरातील 450 मतदान केंद्रांवर ही निवडणूक पार पडणार असून 120 बूथ संवेदनशील आहेत.
  • धुळे- या निवडणुकीत 3 लाख 29 हजार 569 मतदान असून त्यामध्ये 1 लाख 54 हजार 860 महिलांचा समावेश आहे.
  • धुळे- सोमवारी 10 डिसेंबरला येथील शासकीय गोदामात सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
  • धुळे- धुळे महानगरपालिकेच्या 74 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.
  • नगर -सारसनगर परिसरात दोघांवर प्राणघातक हल्ला, निवडणूक वादातून प्रकार घडल्याची चर्चा
  • नगर -प्रशासनाकडून मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली असून अतिसंवेदनशील 41 मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
  • नगर – 2 लाख 56 हजार 719 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
  • नगर महापालिकेच्या 68 जागांसाठी 339 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. एकूण 337 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला आहे.
  • धुळे आणि नगरसाठी महापालिका निवडणूक सुरू असून आज मतदान सुरू झाले आहे.