सरांच्या आठवणींना उजाळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून मनोहर जोशी यांना आदरांजली!

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांना आदरांजली वाहण्यासाठी जोशी कुटुंबीयांच्या वतीने मंगळवारी प्रभादेवी येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी जोशी सरांच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्रानेच नव्हे, तर देशाने एक सुसंस्कृत नेतृत्व गमावले. जोशी सरांची शिस्तप्रियता आणि वक्तशीरपणा कायमच स्मरणात राहील, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.

शोकसभेला शिवसेना नेते दिवाकर रावते, उपनेते अमोल कीर्तिकर, उपनेत्या विशाखा राऊत, विभागप्रमुख महेश सावंत, मिलिंद वैद्य, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, माजी आमदार शिशिर शिंदे, बांधकाम व्यावसायिका अवर्सेकर, शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे यांच्यासह शिवसैनिक, रहिवासी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जोशी सरांचा मुलगा उन्मेष जोशी, अस्मिता  व्यास आणि नम्रता वाघ या दोन मुली, जावई, नातवंडे यावेळी उपस्थित होते.