सत्ताधार्‍यांच्या नुसत्या घोषणाच; एक दमडीही विकासाठी देत नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

कल्याण, डोंबवली, ठाणे आदी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने मोठ्या घोषणा केल्या. तेथे अजून एक दमडीही दिली नाही. येथेही अशाच घोषणा केल्या त्यांना आता निवडणुकीचे वेध लागले आहेत असा टोला राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे यांनी आज पत्रकारांशी बोलताना लगावला.

आमदार दिलीप वळसे म्हणाले की, निवडणुका आल्या की घोषणा करायच्या ही भाजपाची आता सवय आहे. कल्याण, डोंबवली मनपाम कोट्यवधीच्या घोषणा केल्या मात्र, एक दमडीही दिली नाही. सरकार स्थापन होवून चार वर्ष उलटले मात्र नुसता दिशाभुल करण्याचा प्रकार झाला आहे. उद्योगधंदे बुडाले आहेत, उद्योगपतींनी बँका बुडवल्या आहेत, सीबीआयमध्ये जाहीर मतभेद आहेत. प्रसिध्दीमाध्यमांवर मोठा दबाव आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. काहींवर गुन्हा दाखल झाला तर काहींना अटकही झाली. भाषणावरसुध्दा बंदी आली, या सर्वांच्या विरोधता आता लढण्याचा निर्धार आम्ही केला असल्याचे वळसे म्हणाले.

एकत्रित लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका व्हाव्यात, या संदर्भातला निर्णय या बाबत आपण ऐकव्यात नाहीत. निवडणुका लागल्यानंतर व त्यापुर्वीही प्रत्येक राजकीय पक्षाची तयारी असतेच असे ही ते म्हणाले. सध्याच्या सरकारने ग्रामिण भागात लक्ष दिले नाही, मुंबई, पुण्यासारखी मोठी शहरे डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी विकास कामे सुरू केली, स्मार्ट सिटी जाहीर केल्या मात्र एकही काम मार्गी लागले नाही असे ते म्हणाले.