दिव्यांग क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

माजी कर्णधार ‘पद्मश्री’ अजित वाडेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी यंदा मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर डिसएबल्डने शिवाजी पार्क, दादर येथे ‘पद्मश्री अजित वाडेकर स्मृतिचषक दिव्यांग क्रिकेट स्पर्धे’चे आयोजन केले असून 29 जानेवारी रोजी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

उद्घाटनप्रसंगी राहुल शेवाळे (खासदार), माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर, नगरसेविका प्रीती पाटणकर, शाखाप्रमुख यशवंत विचले, रेखा अजित वाडेकर, अशोक वाडेकर, अनिल जोगळेकर,  विनायक धोत्रे, अनिल जाधव प्रशांत पाटील, माजी रणजीपटू अशोक इस्वलकर, राजेश पाटील, सूर्यकांत लाडे यांची उपस्थिती होती.