
दिवाळीत सोन्याचांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येते. आता दिवाळईत सोने खरेदी करण्याऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनेखरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. त्यामुळे सोन्याचे दर वाढले होते. धनत्रयोदशीनंतर बुधवारी सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने चांदी स्वस्त झाले आहे.
सराफा बाजारात बुधवारी 24 ग्रॅम कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 47512 रुपये होता. तर धनत्रयोदशीच्या दिवसापेक्षा 324 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरातही घसरण होत असून चांदीचे दर 1327 रुपयांनी कमी झाले आहेत. बुधवारी एक किलो चांदीचे दर 62,881 रुपये होते.
सध्या शेअर बाजारात चढउतार सुरू असल्याने त्याचा परिणाम सोन्याचांदीच्या दरावर होत आहे. आगामी काळात सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर सोने चांदी स्वस्त झाल्याने खरेदी करण्याऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.




























































