रक्तदानासाठी तरुणाची 40 किमीची पायपीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहीद दिनानिमित्त रक्तदान करण्यासाठी विनोद जाखड या व्यक्तीने 40 किलोमीटरची पायपीट केली आहे. त्यांनी सहा तास सलग पायी प्रवास केला. त्यामुळे रक्तदाता अशी विनोदची नवीन ओळख निर्माण झाली आहे. रक्तदान शिबीरात पोचण्यासाठी 39 वर्षांचे विनोद जाखड यांनी टोंक जिह्यातील टोडारायसिंह शहरातून टोंक जिल्हा मुख्यालयापर्यंत पायी प्रवास केला. विनोद यांनी आतापर्यंत 42 वेळा रक्तदान केले आहे. शहीद दिनानिमित्त लोकांमध्ये रक्तदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी एक पदयात्रा काढली होती. पदयात्रेदरम्यान तरुण रक्तदाते सहभागी झाले होते. किमान 100 वेळा रक्तदान करण्याची आपली इच्छा असल्याचे विनोद यांनी यावेळी सांगितले. त्यातून इतरांनाही रक्तदानासाठी प्रेरित करण्याचा त्यांचा उद्देश आहे.