
खेड तालुक्यातील भडगाव येथील कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत यश मिळवले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वच थरातून कौतुक होत आहे.
सदर परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येते. त्यामध्ये तेज भागणे, सुमीत मुंडे, राजनंदिनी सावंत, स्पर्शिका पांढरे, अथर्व जागडे, दिग्विजय बंडगर, अनुष्का शिंदे, रुद्र तुगांवकर हे विद्यार्थी प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांची प्रात्यक्षिक परीक्षेकरिता निवड झाली. 12 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत. तसेच नववीतील 4 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत. विद्यार्थ्यांना रागिणी जामकर, विनोद टेंबे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अरविंद तोडकरी, माधव पेठे, प्रकाश गुजराथी, पेराज जोयसर, विनोद बेंडखळे, भालचंद्र कांबळे, दीपक लढढा व सर्व सल्लागार, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनदन केले व पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
याच प्रशाळेतील पाचवीतील 4 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत तर त्यापैकी 2 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले आहे. तर जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये १५ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत . तसेच इयत्ता आठवीतील ७ विद्यार्थी राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत व त्यापैकी 6 विद्यार्थ्यांचा राज्य गुणवत्ता यादीमध्ये समावेश झाला आहे . तर जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 28 विद्यार्थी व तालुका गुणवत्ता यादीमध्ये 3 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत
खेड तालुक्यामध्ये आठवीतील शिष्यवृत्ती साठी शहरी व ग्रामीण भागातील 73 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. त्यापैकी 38 विद्यार्थी ज्ञानदीप विद्यालयातील आहेत. तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीसाठी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील शिष्यवृत्तीधारक 59 विद्याथ्यापैकी 19 विद्यार्थी ज्ञानदीपचेच आहेत.
अथर्व जागडे, अर्णव मगदूम, तेज भागणे, राजनंदिनी सावंत , राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीतील गुणवंत राधिका रांगडे, सुयश सोनावणे, वेदिका माने, अन्वय कांबळे, सायली भालेराव, यश साबळे, शमिका शिंदे, गुरुदास पंदेरे, सुमीत मुंडे, राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत अनुष्का शिंदे, सूरज वरक, दिग्विजय बंडगर, संचिता दराडे, शर्वरी बेळूळे, स्वयंम पाटणे, देवाशिष खेडेकर, अनुष्का शिंदे, दुर्गेश कोकणी, स्पर्शिका पांढरे आदींचा समावेश आहे.



























































