अपंगांना त्यांच्या हक्काची घरे द्या, डॉ. उमेश वावरे यांचे निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगळघाट येथील दिव्यांगाच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याबाबत खासदार डॉ. उमेश वावरे यांनी पुढाकार घेत  वर्धा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवले आहे.

हिंगणघाट शहरात एकूण 976 अपंग व्यक्तिची नोंद आहे. त्यातील 500 अंपगाना राहण्यासाठी घर देखील उपलब्ध नसल्याने इतरांच्या सहाय्याने राहण्याच्या प्रयत्न करताना दिसतात. ऋतूमानाच्या सततच्या बदलामूळे काही अपंग बांधवाना स्थाई निवारा नसल्यामुळे अनेकदा नैसर्गिक आपत्तीला सामोर जावे लागते आहे. त्यामुळे या अपंग बांधवाना शासनाकडून ठोस मदत करून त्यांना हक्काचे घर देणे गरजेचे आहे.

हिंगणघाट शहरात म्हाडा अंतर्गत छोटेखाने घरकूल उभारण्यात आले असून यातील काही घरकूल अपंगांना दिल्यास अपंग बांधवाचा राहण्याच्या प्रश्न कायम स्वरूपी सुटले. तसेच अपंग बांधवाच्या उदरनिर्वाहाकरीता शासनाकडून मिळत असलेले तुटपूंजे पेंशन वाढवुन देणे हे देखील महागाईच्या काळात गरजेचे आहे. त्याच शासनाच्या तिजोरीला फटका पडू नये म्हणून हिंगणघाट तालुकातील विविध खाजगी कंपन्याच्या सि.एस.आर फंड या करीता उपलब्ध करून देण्यात यावे असे निवेदन   खासदार डॉ. उमेश वावरे यांनी पुढाकार घेत  वर्धा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवले आहे. पिन्टू कावळे, रामकृष्ण साहरे, सुरेन्द्र कुकसे, संदेश वैरागडे, आईया शेख, इसराईल साकिश खान, पटान जावेद खान, सुनिल घगारे, चन्द्रकांत थुल, पवन अग्निहोत्री, वंदना भुरखडे, भुषण वादिले, गजानन भखाते, विजय पेरके, अविनाश कामडी, आकाश भुते, संदेश मानमुडे, भारती ढोले, वैभव कावळे, सुवर्णा आत्राम, सुजाता पाटिल, जितेन्द्र चापले, जिवन वानखेडे, निशा नैलोत्रा, साक्षी कांबळे, कविता साहारे, मंगला भजभूजे इत्यादि कार्यकर्ता उपस्थिति होते..