अनेकांना जेवताना पाणी पिण्याची सवय असते. काही लोकांना पाणी प्यायल्या शिवाय अन्नाचे घास गिळता येत नाहीत. जेवताना जास्त पाणी पिणे चांगले नसते असे अनेकदा आपण ऐकतो. पाणी जरी पचनासाठी चांगले असले तरी जेवताना पाणी प्यायल्यास त्याचे वाईट परिणाम शरीरावर होऊ शकतात. जेवताना पाणि किंवा द्रव्य पदार्थांचे सेवन केल्यास पचनक्रियेवर उलट परिणाम होऊ शकतो. व त्यामुळे अनेक प्रकारच्या रोंगाना आमंत्रण दिल्यासारखे होते.
तज्ञांच्यामते, जेवणापूर्वी अर्धातास आधी आणि जेवणानंतर अर्ध्यातासाने पाणि प्यावे. पचनक्रिये दरम्यान पोटातील अॅसिड अन्नाचे पचन करण्यास मदत करते. त्यामुळे जेवताना पाणी प्यायल्यास पोटातील अॅसिडचे प्रमाण कमी होते व पचन होण्यास वेळ लागतो. तज्ञांच्यामते, यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊन अन्न अॅसिड आणि एन्झायम्सच्या संपर्कात फार कमी वेळ राहते. काहीवेळेस जेवताना पाणी प्यायल्यास पित्ताचा त्रास संभवतो. पण अजून याचे काही ठोस पुरावे उपल्बध नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
काहींच्यामते जेवताना पाणी प्यायल्यास वजन वाढीच्या त्रासास सामोरे जावे लागते. जेवताना पाणी प्यायल्याने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते व वजन वाढण्यास सुरूवात होते. तसेच जेवताना कोलड्रींक्स, सोडा किंवा शर्करायुक्त द्रव्य प्यायल्यास वजन वाढीच्या त्रासास सामोरे जावे लागते.



























































